शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित विश्रामभवनाला निधीचा ‘ब्रेकर’

By admin | Updated: November 23, 2014 00:25 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव शासनदरबारी धुळखात.

नागेश घोपे / वाशिमजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात ह्यव्हीआयपींह्णच्या सरबराईसाठी प्रस्तावित असलेल्या १२ सुटच्या विश्रामभवनाला निधीने ब्रेक लावले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेल्या या वास्तूचे तयार केलेले अंदाजपत्रक केवळ निधीसाठी रखडलेले आहे.वाशिम शहरात आजमितीला दोन विश्रामगृह आहेत. यापैकी बसस्थानका लगतच्या विश्रामगृहावर चार साधे सुट तर सिव्हिल लाईन परिसरातील विश्रामभवनात दोन साधे व दोन व्हिआयआपी सुट आहेत. वाशिम जिल्हा होण्यापूर्वीच या विश्रामगृहांचे बांधकाम झालेले आहे. तेव्हाच्या तुलनेत आजघडीला वाशिम शहरात व्हीआयपीं च्या वार्‍या वाढलेल्या आहेत. सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन जन्माला आलेल्या वाशिम जिल्ह्याचे मुख्यालय वाशिम शहरात थाटण्यात आल्यामुळे स्वाभाविकच येथे येणार्‍या केद्रीय व राज्यांचे मंत्री, सचिव दर्जाचे अधिकारी, उच्च न्यायालयांचे न्यायाधिश, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, सांस्कृतिक व साहित्यीक क्षेत्रातील मान्यवर त था अन्य व्हीआयपींच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात उपलब्ध असलेले दोन्ही विश्रामगृह या व्हिआयपींच्या सरबराई व मुक्कामासाठी तोकडे पडत असल्यामुळेच जिल्हा प्रशासनाने गत वर्षभरापूर्वी शासनाकडे नविन विश्रामभवनाचा प्रस्ताव ठेवला हो ता जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार गावित व जिल्हा नियोजन समितीने त्यांला मंजुरात दिली होती. सदर कामासाठी शासनाकडुन विशेष बाब म्हणून निधी आणण्याचे त्यावेळी ठरले होते. परंतु त्यांनतरच्या काही महिन्यात गावित यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी झाली. त्यामुळे स्वाभाविकच हा प्रस्ताव रखडला. आता राज्यात सत्तापालट झाला आहे. सत्तारूढ पक्षाचे दोन आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरातील प्रस्तावित विश्रामभवनासाठी निधीची तर तूद व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नरत असल्याचे स्पष्ट केले. सद्या शहरात असलेले विश्रामगृह अपुरे पडत आहेत. त्यामुळे व्हीआय पींची सरबराई करतांना प्रशासनाला अडचणींना सामोरा जावे लाग त असल्याचे देखील अधोरेखीत केले. * असे आहे प्रस्तावित विश्रामभवनसिव्हिल लाईन परिसरातील विश्रामभवनालगत तथा जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील शासकीय खुल्या जागेत नविन विश्राम भवन प्रस्तावित करण्यात आले आहे. तब्बल पाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असलेले सदर विश्रामभवन दोन मजली राहणार असुन तळ मजल्यावर सहा तर वरच्या मजल्यावर सहा सुट उभारण्यात येणार आहेत. यापैकी चार सुट व्हिआयपींसाठी आरक्षित राहणार असुन उर्वरित आठ सुट साधे ठेवण्यात येणार आहेत. वाशिम जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी ८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली औषध निर्माण अधिकार्‍यांची परिक्षा रद्द करण्यात आली असुन ती परिक्षा पुन्हा ३0 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.