चोरट्यांना पोलीस कोठडी

By Admin | Updated: September 1, 2016 01:58 IST2016-09-01T01:58:54+5:302016-09-01T01:58:54+5:30

वाशिम शहरातील आययूडीपी परिसरातील घरात टाकला होता दरोडा.

Police detained for thieves | चोरट्यांना पोलीस कोठडी

चोरट्यांना पोलीस कोठडी

वाशिम, दि. ३१ : स्थानिक आययूडीपी परिसरातील एका घरात सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करुन लाखोंचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना गुरुवारला घडली होती. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल वाढवे यांच्या प थकाने शोध घेऊन केवळ चार दिवसातच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील चौघांनाही न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीदरम्यान जिल्ह्यातील अन्य घटनांचा उलगडा होतो काय? या दृष्टीने तपास केला जात आहे. शहरातील आययूडीपीमधील डॉ. दीपक मुसळे यांच्या घरात भाड्याने राहत असलेल्या शांतीलाल खत्री यांच्या घरामध्ये अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी शस्त्रासह घरामध्ये प्रवेश केला होता. शस्त्राच्या धाकावर घरातील महिलेला बांधून चोरट्यांनी सोने, चांदी व रोख, असा सुमारे ४ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल लुटल्यामुळे शहरात दहशत पसरली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञा त दरोडेखोरांविरुद्ध भादंविचे कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वाढवे यांच्याकडे देण्यात आला. त पास पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे, पोलीस शिपाई राजेश बायस्कर, धनंजय ठाकरे, सचिन देशमुख यांचा समावेश असलेल्या पथकाने आरोपी दीपक गजानन खुनार (वय २५, रा. गवळीपुरा, वाशिम), कार्तिक महादेव सातपुते (वय २६, रा. गोंदेश्‍वर, वाशिम), टिपू सुलतान यशदानी पाशा (वय २६, सौदागरपुरा वाशिम), शेख शकील शेख मोईन (रा. देगलूर नाका, नांदेड) यांना मुद्देमालासह अटक केली. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात असल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: Police detained for thieves