शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:08 IST

वाशिम: सोमवार, २१ ऑगस्ट रोजी  पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. 

ठळक मुद्देबैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीची लगबगवरुणराजाही मेहेरबान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सोमवार, २१ ऑगस्ट रोजी  पोळा सण असून, यानिमित्ताने आवश्यक साहित्य खरेदीसाठी जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. शेतशिवारांमध्ये अहोरात्र राबणारा, पूर्वापारपासून शेतकर्‍यांचा सच्चा साथी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण हर्षोल्लासात साजरा केला जातो. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये यंदाही कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावांत सोमवारी भरणार्‍या पोळ्यामध्ये आपलाच बैल उठून दिसावा, यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साजशृंगार खरेदी करतात. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.  पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शुंगार), गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे आदी साहित्य खरेदी केले जाते. यानुषंगाने रविवारी वाशिम शहरासह जिल्ह्यातील मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव यासह ग्रामीण भागातील बाजारपेठेतही साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. 

वरुणराजाही मेहेरबानवाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेतकर्‍यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. असे असताना पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात सापडला होता. त्याचा परिणाम पोळा या शेतकर्‍यांच्या मुख्य सणावरही होणार असल्याचे संकेत होते. अशातच खांदेमळणच्या पूर्वसंध्येला जिल्हाभरात पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी पहाटेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळल्याने खरिपावर ओढवलेले संकट दूर झाले असून, पिके पुन्हा बहरली आहेत. पर्यायाने पोळा हा सण उत्साहात साजरा होत आहे.