शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 2:09 PM

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गंत अद्यापपर्यंत नोंद न झालेल्या पात्र लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी व नोंद झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी जिल्ह्यात येत्या शुक्रवार, १० जानेवारीपासून तालुकास्तरीय मेळावे होणार आहेत.यासंदर्भात अधिक माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील ज्या शेतकºयांची नावे आधार ‘फेल्यूअर रेकॉर्ड’ यादीत आहेत, त्यांनी ती दुरूस्ती करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सोसायटी सचिव आदिंकडे आधारकार्ड आणि बँकेच्या पासबूकची छायांकित प्रत सादर करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आधार कार्डावरील नाव आधार क्रमांक दुरूस्त तसेच लिंक करून घ्यावेत.ही प्रक्रिया बिनचूक पार पडावी, यासाठी शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत. या मेळाव्यांमध्ये जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्यांमधील बँकांच्या प्रतिनिधींनाही बोलाविण्यात येऊन लाभार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंगे यांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १ डिसेंबर २०१९ नंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणारे सर्व हप्ते आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्येच अदा करण्यात येणार आहेत; मात्र अद्यापही अनेक पात्र लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्याने असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ही बाब लक्षात घेऊन १० जानेवारीपासून तालुकास्तरीय मेळाव्यांचे आयोजन करून आधार लिंकच्या कामाकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिमFarmerशेतकरी