शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतीची दुर्दशा

By admin | Updated: October 27, 2014 00:35 IST

मंगरूळपीर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीची अवस्था दयनीय.

मंगरूळपीर (वाशिम): शहरातील तहसील कार्यालय परिसर व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीची अवस्था दयनीय झाली असून, संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांचे याकडे पूर्णणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. तालुकाभरातील विविध प्रकारच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या खरेदी-विक्रीची कामे तहसील कार्यालय परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत करण्यात येतात. त्या दृष्टीने हे कार्यालय अतिशय उत्तम स्थितीत आणि विविध सोयी-सुविधायुक्त असायला हवे; परंतु परिस्थिती अगदी त्याविरुद्ध आहे. या कार्यालयाची इमारत दर्जाला शोभण्यासारखी नाहीच शिवाय या इमारतीची अवस्थाही मोडकळीस आली आहे. इमारतीचे छत क्षतिग्रस्त झाल्यामुळे त्यावर मेनकापड टाकण्यात आले आहे. त्याशिवाय भितींनाही तडे गेले असून, इमारतीच्या सभोवताल असलेला संपूर्ण परिसर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंंधी पसरली आहे. त्यामुळे येथे विविध कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे कार्यालय महत्त्वपूर्ण असले तरी, या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उल्लेखनीय बाब अशी, की खरेदी-विक्रीच्या व्यवहारांशी संबंधित नोंदींचे जतन करण्याची जबाबदारी या कार्यालयावर सोपविण्यात येते. त्याशिवाय या कार्यालयाकडे इतरही महत्त्वाच्या जबाबदार्‍या आहेत. हे लक्षात घेता कार्यालयाची इमारत ही सुसज्ज आणि मजबूत असायला हवी; परंतु इमारतच काय, तर या इमारतीच्या सभोवताल असलेल्या कुंपणभिंतीलाही ठिकठिकाणी तडे गेले आहेत. तालुकास्तरीय कार्यालय असलेल्या या इमारतीच्या परिसरात स्वच्छतेची काळजीसुद्धा घेण्यात येत नाही.