शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

छळप्रकरणी पतीसह सासरच्यांना दंड

By admin | Updated: December 20, 2014 00:59 IST

वाशिम येथील प्रकार; तीनही आरोपींना प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड.

वाशिम: घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करुन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या आरोपी पतीसह सासरच्या मंडळींना तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रवीण व्ही. चतुर यांनी १९ डिसेंबर रोजी दिला.फिर्यादी उषा राहुल सोनोने ह.मु. किनखेडा या विवाहितेने १0 डिसेंबर २0१३ रोजी दुपारी दोन वाजता अनसिंग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमध्ये उषा सोनोने यांनी पती राहुल वसंता सोनोने व सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरहून एक लाख रुपयांची मागणी करून आपला शारीरिक व मानसिक छळ केला व जिवे मारण्याची धमकी दिली, असे नमूद केले. उषा सोनोने यांच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी आरोपी पती राहुल सोनोने वय ३४ कलावती वसंता सोनोने वय ६५ व कुसूम राजू ठाकरे वय ३८ सर्व राहणार फाळेगाव थेट, प्रतिभा अरविंद मनवर वय ४५ रा. वनोजा मंगरुळपीर, रमा ज्ञानदेव काजळे वय ४0, संगीता अरुण काजळे वय ३५ व ज्योती वसंता मनवर वय ३0 सर्व राहणार काजळांबा या सात जणांविरुद्ध कलम ४९८ अ, ५0६-३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जमादार रमेश चव्हाण यांनी पूर्ण करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले. मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने याप्रकरणी एकूण सात साक्षीदार तपासले. साक्षी-पुराव्यावरून दोषी आढळून आल्यामुळे न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी कलम ४९८ (अ) आरोपी पती राहुल सोनोने, कलावती सोनोने व कुसूम ठाकरे या तिघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येकी तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अँड. कुमूद पेठकर यांनी बाजू मांडली.