२७ डिसेंबरच्या आत शिक्षकांचे वेतन अदा करा!

By Admin | Updated: December 22, 2014 23:49 IST2014-12-22T23:49:05+5:302014-12-22T23:49:05+5:30

शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिका-यांना आदेश.

Pay teachers' salary on 27th December! | २७ डिसेंबरच्या आत शिक्षकांचे वेतन अदा करा!

२७ डिसेंबरच्या आत शिक्षकांचे वेतन अदा करा!

वाशिम : जिल्ह्यातील शिक्षकांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन २७ डिसेंबरच्या आत अदा करा असे आदेश २0 डिसेंबरला शिक्षण उपसंचालकांनी स्थानिक शिक्षणाधिकारी तथा वेतन पथक अधिक्षक यांना दिले. शिक्षण उपसंचालकांच्या या आदेशामुळे शिक्षकांमध्ये आनंदाची लाट संचारली आहे. सध्या निम्मा डिसेंबर महिला उलटला आहे. मात्र, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांवर कार्यरत असणार्‍या शिक्षकांना अद्यापही नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळाले नाही. परिणामी, शिक्षकांचे बजेट कोलमडले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन काही दिवसांपूर्वीच झाले मग वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतनच का रखडले असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत होता. शिक्षकांचे रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना साकडे घालण्यात आले होते. याच मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेही आंदोलन केले होते. यावेळी शिक्षण उपसंचालकांनी या बाबत आढावा घेऊन शिक्षकांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन २७ डिसेंबरच्या आत द्यावे असे आदेश स्थानिक शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक यांना दिले.

Web Title: Pay teachers' salary on 27th December!