मतदान केंद्रांवर पाेलिसांचा ‘वाॅच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:44 IST2021-01-16T04:44:30+5:302021-01-16T04:44:30+5:30

मतदान सुरू असताना जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अनेक मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच यावेळी ...

Paelis 'watch' at polling stations | मतदान केंद्रांवर पाेलिसांचा ‘वाॅच’

मतदान केंद्रांवर पाेलिसांचा ‘वाॅच’

मतदान सुरू असताना जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अनेक मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी, प्रतिनिधी यांना मार्गदर्शक सूचना केल्या. वसंत परदेशी यांनी शिरपूर मतदान केंद्रासह परिसरातील अनेक मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

मतदान केेंद्रावर चाेख बंदाेबस्त

कोठारी : ग्रामपंचायत निवडणूक मतदानाकरिता येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत ९ सदस्यांकरिता १५ जानेवारी राेजी मतदान झाले. प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त असून, मतदानाकरिता येत असलेल्या मतदारांच्या स्वागताकरिता मुख्य द्वारावर भव्य रांगोळी काढली हाेती. वृध्द मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून मतदान करून घेण्याकरिता पाेलीसपाटील सतीश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Paelis 'watch' at polling stations