शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाहनांच्या अपघातात एक ठार; चार जखमी

By admin | Updated: September 13, 2016 02:57 IST

मालेगाव तालुक्यातील मुंगळा फाट्यावरील घटना; जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश.

मालेगाव (जि. वाशिम), दि. १२ : एस.टी. बस, कंटेनर आणि दुधाची वाहतूक करणारा ट्रक अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. ही घटना मालेगाव-मेहकर मार्गावरील मुंगळा फाट्यावर सोमवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहितीनुसार, दूध घेऊन जाणारा राजहंस कंपनीचा ट्रक (क्रमांक एमएच १७, ३९८४) मालेगावकडे येत असताना मेहकरकडे जाणारा मोठा कंटेनर आणि मालेगावच्या दिशेने येणारी शिर्डी-मंगरूळपीर (क्रमांक एमएच ४0 वाय ५३५४) या बसमध्ये भीषण अपघात झाला. यात दूध वाहतूक करणार्‍या ट्रकचा चालक लक्ष्मण तोरे (रा. संगमनेर) हा जागीच ठार झाला. तसेच ट्रकमध्ये असलेला किनर सुरेश पटोळे जखमी झाला असून, वंदना अनिल कुरवाडे (रा. सोनाटी) या महिलेच्या पायाला जबर मार लागला. यासह अनिल दत्ता कुरवाडे (वय १५), शुभम अनिल नरवाडे (वय १५) ही दोन मुलेही जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि शिवसेना रुग्ण वाहिकाचे किरण चांगाडे, सुरेश झोंबडे, मुख्तार आणि गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धस्तरावर बचावकार्य केले. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून १0८ क्रमांकाच्या अँम्बुलन्समधून अकोला येथे हलविण्यात आले. याबाबत पुढील तपास मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.