शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

एकाही लाभार्थीला मिळाली नाही मोफत रेती! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:18 IST

Washim News मोफत रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न लाभार्थिंमधून उपस्थित केला जात आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : घरकुल लाभार्थ्यांना दिलासा म्हणून जानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याचे शासन आदेश निघाले. तथापि, मोफत रेतीचा लाभ अद्याप जिल्ह्यातील एकाही लाभार्थिला मिळाला नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दारिद्र्य रेषेखालील तसेच पक्के घर नसणारे, आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थिंना शासनाच्या विविध योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. लाभार्थिंना दिलासा म्हणून जानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसे शासन आदेशही जानेवारी २०१९ मध्ये निघाले. दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जवळपास आठ हजार घरकुले मंजूर झालेली असून, यामध्ये सन २०२०-२१ या वर्षातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गतची (ग्रामीण) २०३३ व रमाई आवास योजनेंतर्गतच्या २००० घरकुलांचा समावेश आहे. पर्यावरण विभागाची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव गत चार वर्षांपासून झालेला नाही. त्यामुळे लाभार्थिंना मोफत रेतीही मिळू शकली नाही. बाहेर जिल्ह्यातून येणारी महागडी रेती परवडणारी नसल्याने लाभार्थिंना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरकुल योजनेंतर्गतचे अनुदान अनियमित असून, मोफत रेतीही मिळत नसल्याने घरकुलांचे बांधकाम पूर्ण कसे करावे? असा प्रश्न लाभार्थिंमधून उपस्थित केला जात आहे.

मोफत रेतीसाठीचे अर्ज धूळखातजानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याचा शासननिर्णय झाल्याने, या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून तहसीलस्तरावर पात्र लाभार्थिंकडून मोफत रेतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, रेतीघाटांचे लिलावच झाले नसल्याने या अर्जावर कोणतीही कार्यवाही होऊ शकली नाही. चालू वर्षातही पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली नाही तर रेतीघाटांचे लिलाव होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मोफत रेतीसाठी मागविण्यात आलेले अर्ज सध्या तहसीलस्तरावर धूळखात आहेत. 

रेतीचे प्रतिब्रास दर भिडले गगनाला जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने परजिल्ह्यातून रेती विकत घ्यावी लागत आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या या रेतीचे प्रतिब्रास दर सात ते आठ हजार रुपये असे आहेत. घरकुल बांधकामासाठी महागडी रेती परवडणार नसल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थिंमधून उमटत आहेत. 

घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याचा शासननिर्णय असला तरी अद्याप मोफत रेती मिळालेली नाही. त्यामुळे परजिल्ह्यातील महागडी रेती विकत घेण्याची वेळ आली आहे. घरकुल लाभार्थिला महागडी रेती परवडणारी नाही.- अरविंद वानखडे, घरकुल लाभार्थी

पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेली नसल्याने जिल्ह्यात रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत. रेतीघाटांचे लिलाव झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.        

- विनय राठोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना