शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ना रक्त तपासणी, ना सोनोग्राफी; पाच टक्के महिला थेट प्रसुतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:55 IST

Washim News : गर्भवती महिलांची नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी झाल्यास व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी करता येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुदृढ बाळ सुलभरित्या जन्माला यावे, याकरिता गर्भवती महिलांनी नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील काही गर्भवती महिला प्रसुतीसाठी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असल्याने यावेळी विविध तपासण्यांसाठी एकच धावपळ उडते. वर्षभरात जवळपास ५ टक्के महिला थेट प्रसुतीसाठी दाखल झाल्या.प्रसुतीपूर्वी गर्भवती महिलांची नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी झाल्यास व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाण कमी करता येते. ग्रामीण भागातील काही महिलांची गरोदरपणात नियमित तपासणी होत नाही. कोरोनाकाळात तर त्यात आणखी भर पडली. गर्भधारणेपासून जन्मापर्यंत काही शारीरिक व्याधी व आजाराची शक्यता असल्यास त्याची माहिती नियमित तपासण्यांद्वारे बऱ्याच प्रमाणात मिळते. प्रत्येक गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीपश्चात आरोग्य सुविधा, प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत मोफत उपलब्ध आहेत. परंतु तरीही ग्रामीण भागातील काही गरोदर महिला एकदाही रक्त तपासणी, सोनोग्राफी करत नाहीत. थेट प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असल्याची स्थिती गत वर्षभरात दिसून आली. अशावेळी अनेकदा प्रसुतीदरम्यान, गर्भात गुंतागुंत अवस्था समोर येते. त्यातून अनेकदा मातेसह शिशूच्या जीवाला धोका निर्माण होतो, तर व्यंगासह आयुष्य काढण्याची वेळ शिशूवर येते. गरोदरपणातील गुंतागुंत आणि गर्भातील शिशूत असलेले व्यंग वेळीच समोर येण्यासाठी नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी व्हावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. 

चाचणी आवश्यकगर्भातील बाळाची अवस्था काय, काही व्यंग तर नाही ना, वाढीची अवस्था, गरोदर मातेला काही आजार, तर नाही ना, याची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी रक्ताच्या विविध चाचण्या तसेच सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात रक्त चाचणी, सोनोग्राफीची सुविधा मोफत उपलब्ध आहे. सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलांनी नियमित रक्त चाचणी व सोनोग्राफी करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी जिल्हा सामान्य रुग्णालयासह सरकारी दवाखान्यांत मोफत केली जाते. शहरी भागातील जवळपास सर्वच गर्भवती महिला नियमित तपासणी, सोनोग्राफी करतात. ग्रामीण भागातील काही महिला मात्र थेट प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात. ग्रामीण भागातील महिलांनीदेखील नियमित रक्त तपासणी, सोनोग्राफी करायला हवी. यामुळे गर्भातील शिशूत काही व्यंग असेल तर निदर्शनास येऊ शकते.- डॉ. शेख आसिफ हुसेनस्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

टॅग्स :washimवाशिमpregnant womanगर्भवती महिला