नागरतासची जगदंबा माता

By Admin | Updated: September 27, 2014 23:47 IST2014-09-27T23:47:13+5:302014-09-27T23:47:13+5:30

दर्शनासाठी विदर्भातून येतात भाविक.

Nagrata's Jagdumba mother | नागरतासची जगदंबा माता

नागरतासची जगदंबा माता

मालेगाव : नागरतास येथील जगदंबा देवीच्या दर्शनासाठी विदर्भातून भाविक येतात. नागपूर जालना राज्य महामार्गावर मालेगाव शहरापासून तीन कि.मी. अंतरावर सदर संस्थान आहे.
संस्थान परिसरात तुळजाभवानी, रेणुकादेवी, नागरतासवासीनी, आसरामाता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर सभागृह बांधण्यात आले आहे.संस्थान परिसरात विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, आमदार १२ वा वित्त आयोग यांच्या निधीतून सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. विधान परिषद सदस्य यांच्या स्थानिक विकास निधीतून संस्थानला जोडणार्‍या रस्त्यावरील पुल बांधण्यात आला आहे.मंदिर परिसरात आकर्षक बगिचा तयार करण्यात आला आहे. मंदिरासमोरील परिसरात बेड काँक्रिट टाकण्यात आले आहे. चेक टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. काटेपूर्णा नदीच्या किनार्‍यावरील मंदिराचा परिसर संस्थानचे विश्‍वस्त मंडळानेव भाविकांच्या पुढाकाराने विकसित करण्यात आला आहे.नवरात्र महोत्सवात भाविक मोठय़ा संख्येने दर्शनासाठी येतात. सकाळी ५.३0 वाजता आरती होते. मालेगाव-नागरतास रस्त्यावर विद्युत दिवे लावले आहेत.मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या मंदिर रस्त्याची अतिशय दुदर्शा झाल्याने मात्र पायदळ दर्शनाकरीता जाणार्‍या भाविकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हयातील प्रसिध्द देवी मंदिरात नागरतास मंदिराचा समावेश असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिध्द असल्याने येथे नवरात्रात्सवात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते.

Web Title: Nagrata's Jagdumba mother