शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा २०८२ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:12 IST

२०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या संभाव्य पत पुरवठा आराखडयाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकरी बांधव, शेतीपुरक व्यवसाय करणारे व्यक्ती, महिला आणि पुरुषांचे बचतगट, अन्न प्रक्रिया उद्योग, फळबागांना चालना, शेतकरी उत्पादक गट तसेच सुशिक्षीत बेरोजगारांना स्वंयरोजगार उभारण्यासाठी मदत करुन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने वाशिम जिल्हयासाठी तयार केलेला सन २०२०-२१ या वर्षाचा २०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या संभाव्य पत पुरवठा आराखडयाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, रिजर्व बँक आॅफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक बि.के. सिंह, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी मोडक यांच्या हस्ते यावेळी नाबार्डच्या सन २०२०-२१ च्या संभाव्ययुक्त पतपुरवठा आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.जिल्हयाच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता जिल्हयात कृषी व इतर प्राधान्य क्षेत्रामध्ये कर्ज वाटप करण्याकरीता नाबार्डमार्फत तयार करण्यात आलेला संभाव्य खर्च वितरण आराखडा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांनी सादर केला. खरीब व रब्बी हंगामातील पीक कर्ज, कृषी मुदत कर्ज, शेतीपुरक व्यवसाय, अन्न प्रक्रिया, फळबाग लागवड, शिक्षण, घरकुल अर्थात गृहकर्ज असा प्रस्तावित २०८२ कोटी ५५ लाख ९६ हजार रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोडक यांनी मंजूरी दिली आहे.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक निलेश राठोड, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक आर.के. निपाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे तसेच जिल्हयातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिम