शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लाखमोलाच्या फटाक्यांची ‘आतषबाजी’

By admin | Updated: October 27, 2014 00:49 IST

वाशिम जिल्हावासीयांनी तब्बल १९ लाख रुपयांपेक्षाही अधिक रकमेची आतषबाजी.

वाशिम : दीपावलीच्या प्रकाश पर्वावर जिल्हावासीयांनी तब्बल १९ लाख रुपयांपेक्षाही अधिक रकमेचे फटाके उडविले. फटाक्यांच्या भावात वाढ झाली असताना बालहट्टांसमोर पालकांनी नमते घेत काही प्रमाणात खरेदी केल्याचे यावेळी दिसून आले. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन कान बहिरे होणे, आग लागणे, त्वचार विकार यांसह इतर हानी होते. त्यामुळे दिवाळी सणात फटाके फोडू नये, अशी विचारसरणी बाळगणारी एक फळी समाजात निर्माण झाली आहे. परंतु, दिवाळीसोबत फटाक्याचे अतूट नाते जुळले असल्यामुळे फटाके उडविणार्‍यांची संख्याही मोठी आहे. हे लक्षात घेऊन वाशिम शहरातील परवानाधारक फटाके विक्रेत्यांची तब्बल ५0 पेक्षाही अधिक दुकाने येथील आंबेडकर चौक ते नगरपालिका मार्गावर लागली होती. दिवाळीच्या पृष्ठभूमीवर येथील फटाका व्यावसायिकांनी साधारणत: एक लाखापासून दोन-तीन लाखापर्यंतच्या फटाक्यांचा दुकानात भरणा केला होता. यामध्ये चायना फटाके, सद्दाम बॉम्ब, मिठ्ठू छाप फटाके, टिकली, झाड यासह इतर फटाक्यांचा समावेश होता. येथील फटाका व्यावसायिक अकोला, नागपूर, जळगाव, शिवाकाशी या गावांमधून फटाके बोलावितात. गोडावूनची उपलब्धता नसल्यामुळे एक व्यावसायिक एके दिवशी एक लाखाचाच फटाक्यांचा माल बोलावू शकतो. प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षी ज्या दरात व्यावसायिक ग्राहकास फटाका विकत होता, त्या दरात यावर्षी व्यावसायिकांनी फटाके खरेदी केले. त्यामुळे नाइलाजाने व्यावसायिकांना जादा दरात फटाके विकावे लागले आहे. वाशिम येथून तालुकाभरात फटाके जातात. त्यामुळे अंदाजे १0 लाखांपेक्षा अधिक फटाक्यांची विक्री कारंजा फटाका असोसिएशनकडून करण्यात आली आहे.