शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाचा अभाव; गुन्हेगारी अनियंत्रित!

By admin | Updated: February 15, 2016 02:14 IST

वाशिम शहर पोलीस ठाण्यात केवळ ५0 टक्के कर्मचारी कर्तव्यावर.

धनंजय कपाले / वाशिम: मार्चे, आंदोलने, बलात्कार, चोरी, घरफोडी या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये केवळ ५0 टक्के कर्मचारी कर्तव्यावर आहेत. परिणामी, गुन्हेगारीवर आळा घालणे व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची दमछाक होत आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये १२८ कर्मचार्‍यांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी १0८ कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या १0८ कर्मचार्‍यांपैकी अंदाजे २५ ते ३0 कर्मचारी वरिष्ठ कार्यालय, अधिकारी व लोकप्रतिनिधींचे सुरक्षारक्षक म्हणून बाहेर आहेत. शहर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावरील ७0 ंपैकी १७ कर्मचारी महिला पोलीस आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ५0 ते ५५ कर्मचार्‍यांच्या बळावर शहराची सुरक्षा सांभाळण्याचे कार्य सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून वरिष्ठ कार्यालयामध्ये चिटकून बसलेल्या कर्मचार्‍यांना पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य करणे आता नकोसे झाले आहे. अपुर्‍या संख्याबळामुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पोलीस अधिकारी अपयशी ठरत असल्याचे वास्तव अलीकडे घडलेल्या अनेक घटनांमधून अधोरेखित झाले आहे. पोलीस स्टेशनमधील कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या संख्याबळामुळे पोलिसांचा कारभार बेभरवशाचा झाला आहे. अत्यंत गंभीर गुन्हे भुरट्या गुन्ह्यांप्रमाणे घडत आहेत. पोलीस स्टेशनमधील स्टेशन डायरीत गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या तुलनेत गुन्हे उघडकीस (डिटेक्शन) आणण्याचे प्रमाण नगण्य होऊन बसल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनुभवी कर्मचार्‍यांची विशेष टिम पोलीस स्टेशनच्या दिमतीला देणे अपेक्षित आहे. पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अमरावती विभागात वाशिम शहराची नोंद क्रिमिनल शहर म्हणुन होईल, अशी भीती आता शहरवासीयांना वाटू लागली आहे. वाशिम शहरातील क्राइम रेट कमी करण्याची कसरत पोलीस यंत्रणेला करावी लागणार आहे.