शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोचा वार्षिक आराखडा ठरविण्यात आता मजूरांचा सहभाग

By admin | Updated: December 20, 2014 00:59 IST

प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबाविण्यात येणार.

वाशिम : मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्‍या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजूर अंदाजपत्रक तथा वार्षिक कृती आराखडा आता मजुरांच्या सहभागातून तयार केला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३५१ पंचायत समित्यांपैकी १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबाविण्यात येणार आहे. रोजगाराच्या शोधात भटकंती करणार्‍या मजूरांना त्यांच्याच परिसरात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये दरवर्षी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत मजूर अंदाजपत्रक तथा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येतो. आजवर संबंधित कर्मचारी अथवा अधिकारी कार्यालयात बसूनच हे आराखडे तयार करायचे, त्यामुळे प्रत्यक्षात ग्रामस्थांना कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे आहे, या बाबीचा विचार यामध्ये होत नसे. मजूरांचेही अभिप्राय घेण्यात येत नसत. याचा परिणाम योजनेवर होत होता. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा निधी मोठय़ा प्रमाणात शिल्लक असूनही कामे घेण्यासाठी आवश्यक उत्सुकता दिसून येत नव्हती. शिवाय मजूरदेखील कामाप्रती उदासीनच दिसत होते. याला आळा घालून या योजनेतून अधिकाधिक कामे व्हावी, जास्तीत जास्त मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने मजूर अंदाजपत्रक व वार्षिक कृती आराखडा तयार करताना त्यामध्ये मजूरांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील ३५१ पंचायत समित्यांपैकी १३८ पंचायत समित्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.