वाशिम जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची दप्तर तपासणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:18 PM2019-08-18T15:18:12+5:302019-08-18T15:19:14+5:30

सव्वा महिन्यापासून जिल्ह्यातील एकाही ग्राम पंचायतची दप्तर तपासणी झाली नाही.

Inspection of gram panchayats in Washim district stopped | वाशिम जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची दप्तर तपासणी रखडली

वाशिम जिल्ह्यातील ग्राम पंचायतींची दप्तर तपासणी रखडली

Next


सभाही नाहीत : ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ९ जुलैपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन पुकारले असून, अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, सव्वा महिन्यापासून जिल्ह्यातील एकाही ग्राम पंचायतची दप्तर तपासणी झाली नाही तसेच एकही मासिक सभा होऊ शकली नाही.
ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या असून, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत केली नाही आदी आरोप करीत न्यायोचित मागणीसाठी ग्रामसेवकांनी ९ जुलैपासून पुकारलेले असहकार आंदोलन १८ आॅगस्ट रोजीदेखील कायम होते. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली तसेच चर्चाही केली. प्रलंबित मागण्यांसंदर्भात १० मे १७ मे २०१९ या दरम्यान असहकार आंदोलन पुकारले होते. दोन महिन्यात प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, दोन, तीन मागण्यांचा अपवाद वगळता अन्य मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचे कारण समोर करीत ग्रामसेवक संघटनेने ९ जुलैपासून बेमुदत असहकार आंदोलन पुकारले आहे. कोणत्याही सभेला न जाणे, वरिष्ठांना कोणतेही अहवाल न देणे, ग्राम पंचायत तपासणीकरीता दप्तर न दाखविणे असे या आंदोलनाचे स्वरुप आहे. अद्याप या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या दप्तराची तपासणी होऊ शकली नाही तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कोणत्याही सभेला ग्राम सेवकांची उपस्थिती नसल्याने प्रशासकीय कामकाज खोळंबले आहे. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे व जिल्हा सचिव अरूण इंगळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Inspection of gram panchayats in Washim district stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.