शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेतील ४९0 बोगस लाभार्थ्यांचे मानधन रोखले

By admin | Updated: September 28, 2015 02:11 IST

ऑनलाइनचा दणका; खोट्या लाभार्थ्यांंमध्ये भूधारकांचाही समावेश.

मानोरा (जि. वाशिम): शासनाच्यावतीने सर्वच योजनांसाठी लाभार्थींंची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असताना या प्रक्रियेंतर्गत मानोरा तालुक्यात विविध योजनांसाठी पात्र नसतानाही शेकडो व्यक्ती शासनाची दिशाभूल करून मानधन मिळवित असल्याचे आढळून आले आहे. ऑनलाइन नोंदणी आणि तपासणीत मानोरा तालुक्यात २७ सप्टेंबरपर्यंंत ४९0 बोगस लाभार्थी आढळले असून, तहसील प्रशासनाने त्यांचे मानधन रोखले आहे. शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र नसतानाही हजारो व्यक्ती बनावट कागदपत्रे सादर करून त्याचा लाभ घेत आहेत. या पृष्ठभूमीवर शासनाच्यावतीने प्रत्येक योजनेतील लाभार्थींंची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. या अंतर्गत आजवर नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थींंपैकी जवळपास ४९0 लाभार्थी पात्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी अनेकांच्या नावे शेतजमिनीचा सातबारा असल्याचे ऑनलाइन प्रक्रियेत स्पष्ट झाल्यामुळे निराधार योजनांतर्गत त्यांना मिळत असलेले मानधन तहसील प्रशासनाच्या संजय गांधी निराधार योजना विभागाकडून रोखण्यात आले आहे. यापैकी ज्या लाभार्थ्यांंच्या नावे शेतजमिन आहे अशा लाभाथर्र्ींंची यादी तयार केली आहे. ऑनलाइन शोध मोहिमेंतर्गत आजवर संजय गांधी निराधार योजनेतील १७३ लाभार्थी व श्रावण बाळ योजना ३१७ असे एकूण ४९0 लाभार्थींंचे मानधन रोखण्यात आले. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. ज्या लाभार्थींंचे मानधन बँकेत जमाच झाले नाही त्यापैकी अनेकांनी मानोरा तहसीलमधील संजय निराधार कार्यालयाकडे धाव घेत चौकशी केली. त्यावेळी त्यांना संबंधित तलाठय़ांकडून सातबारा नसल्याचे प्रमाणपत्र, तसेच इतर पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे अनेकांची भंबेरी उडाली. शासनाच्या ऑनलाइन शोध मोहिमेत अनेकांकडे शेतजमीन असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या निराधार लाभार्थींंचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये आहे. ज्याचे वय ६५ वर्ष आहे अशा व्यक्तींना, तसेच ज्यांची मुले पालन पोषण करण्यास असर्मथ आहेत, अशा लोकांना निराधार योजनेचा लाभ दिला जातो. विधवा, अत्याचारित, अपंग महिलांनाही संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान दिले जाते; पण श्रावण बाळ योजना असो वा संजय गांधी निराधार योजना. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करताना तलाठी अहवाल आवश्यक असतो. त्यांच्याजवळ शेती आहे किंवा नाही हे तलाठी अहवाल सांगतो एवढे मोठे लाभार्थी मानधनापासून वंचित ठेवल्या जाते त्याला महसूल प्रशासन जबाबदार आहे, असा मुद्दा त्रस्त नागरिक उपस्थित करत आहे. आई व वडील निराधार योजनेचे लाभार्थी आहे; पण त्याच्या मुलाच्या नावे शेती आहे अशाही लाभार्थ्यांंंना वंचित ठेवण्यात आले. शासनाकडून निराधारांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ खर्‍या लाभार्थींंऐवजी इतर लोक च घेत असल्याचे स्पष्ट होत असून, शासनाकडून विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा त्यामुळे एकप्रकारे अपहारच झाल्याचे सिद्ध होत असल्याने बनावट लाभार्थींंंसह त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणार्‍यांवरही कारवाई करणे गरजेचे असून, याबाबत शासनाने सखोल विचार करायला हवा.