शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गौण खनिज प्रकरणी १२ लाखाचा दंड वसूल

By admin | Updated: December 24, 2014 00:34 IST

कारंजा लाड तालुक्यातील प्रकार; महसुल विभागाची कारवाई.

प्रफुल बानगावकर /कारंजा लाड (वाशिम): इ-क्लास जमिनीवरील गौण खनिजाचे उत्खनन करून वापरासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे गेल्या दोन वर्षात अवैध गौण खनिजाच्या चोरीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात १३१ वाहन चालकांना अवैध गौण खनिज चोरी करताना रंगेहाथ पकडून संबंधित मालकाविरूद्ध १२ लाख ६८१४0 रूपये दंड आकारून कारवाई केली.इ-क्लास जमिनीवरील रेती, मुरूम, गिट्टी, माती आदी विविध प्रकारचे गौण खनिज वापरण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे तालुक्यात गौण खनिजाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात रेतीचे आठ घाट आहे. मात्र शासनाने परवानगी न दिल्यामुळे त्या घाटातील रेती अप्रत्यक्षरित्या बांधकाम करणार्‍या ठेकेदारांनी तसेच घरगुती बांधकाम करणार्‍यांनी या घाटातून चोरी केल्यामुळे आज रोजी या घाटात खड्डे निर्माण झाले आहे. तसेच कोळी, वालई, खेर्डा, कारंजा या परिसरातून मुरूमाची मोठय़ा प्रमाणात गौण खनिजाची चोरी होते. त्या गौण खनिज चोरणार्‍याविरूद्ध महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या अंगावर वाहन नेवून त्यांना मारण्याची धमकी देण्याचा प्रकार तालुक्यात गेल्या दोन वर्षात पहायला मिळाला. त्यामुळे एकटा कर्मचारी कारवाई करण्यास पुढे येत नाही.मात्र उपविभागीय अधिकारी दिनकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने २0१३ या वर्षात अवैध गौण खनिजाच्या चोरीचे प्रकरणे उघडकीस आणुन १0१ वाहनाविरूद्ध कारवाई केली व ९ लाख दंड वसुल केला. २0१४ या वर्षात ३१ वाहनधारकाविरूद्ध ३६८१४0 हजार रूपये दंड असे एकूण १३१ वाहनधारकाविरूद्ध गौण खनिजाची चोरी करणार्‍या संबंधिताविरूद्ध १२६८१४0 रूपये दंड करून कारवाई केल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली.