चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:53 AM2019-11-15T11:53:03+5:302019-11-15T11:54:35+5:30

पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली .

Husband murdered wife over suspicion Mangrulpir | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली .
यासंदर्भात रोशन खान रशीद खान रा. पोघात यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार १३ नोव्हेंबरच्या रात्री माझी आई नजीराबी ही घरी येवून मला सांगितले की, एजाज खान रोशन खान (३२) रा . पोघात याने त्याची पत्नी बिलकीस बी (३०) ही झोपेत असतांना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली. त्यात तीच्या डोक्याला जखम होऊन रक्त निघत असून ती मरण पावली आहे. एजाज खानने तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवाने मारले आहे.अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी एजाज खानला अटक करून त्याचेवर कलम ३०२, २०१ भांदवी नुसार गुन्हा दाखल केला . दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे,पीएसआय मंजुषा मोरे,पीएसआय प्रमोद सोनवणे,सुष्मा परंडे,हेकॉ अंबादास राठोड,साहेबराव राऊत,ए एस आय भगत,संदीप खडसे,,उमेश ठाकरे,अमोल मुंदे,किशोर काकडे, मोहम्मद परसुवाले, गोपाल कवर, मिलिंद भगत,सचिन शिंदे,होमगार्ड शितालदास उचित व इतर , यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत. घटनेतील आरोपी हा विष पिऊन आत्महत्या करण्याचे तयारीत होता तसेच त्याच्या हातातून पोलिसांनी सदर विषाची बॉटल जप्त करून किन्हीराजा येथून तात्काळ सापळा रचून शिताफीने अटक केली.आरोपीची मानसिक स्थिती बरी नसल्याने पोलीस कोठडीची मागणी राखून ठेऊन न्यायालयीन कोठडीची मागणी केली, तसेच न्यायालयाने सदर मागणी मान्य करून आरोपीची रवानगी जिल्हा कारागृह वाशीम येथे केली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Husband murdered wife over suspicion Mangrulpir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.