शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट माहितीव्दारे विधवेला केले बेघर!

By admin | Updated: March 31, 2017 19:38 IST

मेडशी : ग्रामपंचायतच्या कागदपत्रात बनावट माहिती भरून विधवा महिलेस पाच अपत्यासह बेघर केल्याचा प्रकार मेडशी येथे उघडकीस आला आहे.

मेडशी येथील प्रकार : न्यायासाठी पिडित महिलेचा टाहो

मेडशी : ग्रामपंचायतच्या कागदपत्रात बनावट माहिती भरून विधवा महिलेस पाच अपत्यासह बेघर केल्याचा प्रकार मेडशी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी पिडित महिलेने गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शे. युसूफ शे. अब्दुल हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते. त्यांच्या आईने आपला नातू शे. युसुफ यांचा मुलगा शे. अकबरच्या नावे राहते घर केले होते. कालांतराने ते रोजगारासाठी परिवाराला घेऊन पुणे येथे गेले. तेथे युसुफ यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी शे. युसूफ यांची पत्नी जानबी शे. युसूफ या मेडशी येथे त्यांना घरकूल मंजूर झाल्यामुळे गावी परतल्या. दरम्यान, घरकुलासाठी मालकीची जागा दाखविणे आवश्यक असल्याने त्यांनी ग्रामपंचायतकडे जागेचा ८ ह्यअह्ण मागितला. त्यावेळी त्यांच्या किंवा त्यांच्या मुलाच्या नावे जागाच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. याबाबत चौकशी केली असता ग्रामपंचायतच्या ठराव क्रमांक ६ दिनांक २९ आॅक्टोबर २०१० नुसार सदर जागा जानबी आणि शे. युसुफ यांचा मुलगा शे. अकबर याने त्याच्या पित्याच्या मोठ्या भावाच्या नावे केल्याचे ग्रामपंचायतच्या कागदपत्रावरून स्पष्ट झाले. प्रत्यक्षात शे. अकबर याचा जन्मच १२ एप्रिल २००० रोजी झाला. त्यामुळे केवळ सहा महिन्याचा असतानाच त्याने ग्रामपंचायतमध्ये जाऊन पित्याच्या मोठ्या भावाच्या नावे जागा केली तरी कशी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.-------------------सदर प्रकरणाची तक्रार आजच आपल्याकडे प्राप्त झाली आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी जुनी कागदपत्रे तपासणार असून, त्यानंतरच आपल्याला काही सांगता येईल. - डी. एस. वाहोकार, ग्रामसचिव, मेडशी