शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक तलावाची दुरवस्था

By admin | Updated: December 15, 2014 00:56 IST

सौंदर्यीकरणासाठी निधीची वानवा : तीन वर्षांपासून निधीचा प्रस्ताव थंड बस्त्यात.

नाना देवळे / मंगरूळपीर (वाशिम)शहरातील क्रमाक २ च्या नगरपालीका शाळेलगत असलेल्या ऐतिहासिक तलावाला सद्य:स्थितीत बकालपण आले आहे. उदासीन लोकप्रतिनिधी तथा नेभळट प्रशासनाच्या हलगर्जीमुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण रखडले आहे. मंगरुळपीरवासीयांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मध्यवर्ती भागात हा पुरातन व ऐतिहासिक तलाव आहे. सदर तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण करण्याची मागणी अनेक वेळा समोर आली आहे. अनेकांनी याबाबत नगरपालिकेकडे पाठपुरावाही केला आहे. परंतु, पालिकेच्या शासन, प्रशासनाला या महत्वपूर्ण बिषयाकडे लक्ष देण्यासाठी अद्याप मुहूर्त गवसलेला दिसत नाही. नगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात गत सात वर्षापूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या जलकुंभातील पाण्याचा प्रवाह या तलावाकडे वळविण्यासाठी एका नालीचे खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे बांधकाम विभाग, महात्मा फुले गार्डन परिसरातील पावसाचे पाणी सरळ या नालीतून तलावात सोडण्याचा मार्ग सुकूर झाला होता; मात्र त्यानंतर माशी शिंकली. सदर तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण्यात येईल, असे मौखिक आश्‍वासन तत्कालीन मुख्याधिकारी राठी मंगरूळपीरवासीयांना दिले होते. ाळाच्या ओघात दस्तुरखुद्द राठींपासून आतापर्यंत आलेले मुख्याधिकारी तलाव सौदर्यीकरणाची बाब सोयीस्करपणे विसरले आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खोदण्यात आलेली नाली सद्य:स्थितीत बुजली गेली आहे. हा तलाव पर्यावरणासह भूगर्भातील पाण्याची पातळी वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.यावर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने तुडुंब असला असून, स्वाभाविकच या भागात असलेल्या विहीरीची व हातपंपाची पाण्याची पातळी वाढली आहे उल्लेखणीय बाब अशी की या तलावाखालील भागात असलेल्या दोन हातपंपामधून पाणी ओसडून वाहत आहे, या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देउन या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास हा परिसर निसर्गरम्य व शहराच्या वैभवात भर पडेल. शहर विकास आराखडयात मुळ आरक्षणानुसार शहराची जलपातळी वाढविण्यासाठी पुरक असलेल्या तलावासाठीच आरक्षण कायम ठेवण्याची मागणी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य प्रा.अरुण इंगळे यांनी नगर पालीका प्रशासनाकडे केली आहे.