शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्री चालणा-या संस्थांवर टाच

By admin | Updated: December 12, 2014 00:44 IST

आर्थिक फायद्यासाठीच संस्थांचा वापर : अनेक संस्था निघणार अवसायनात.

बुलडाणा : राजकीय व आर्थिक लाभ तसेच मतदानासाठी संस्था काढणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील अनेक संस्था केवळ कागदावर चालविल्या जातात अशा कागदोपत्री संस्थांना आता शासनाने लक्ष्य केले असून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्या तील सुमारे एक हजार संस्था बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गावपातळीवरील दूध संस्थेपासून ते तालुका पातळीवर काम करणार्‍या औद्योगिक पणन यासह विविध संस्थांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात किमान ३५0, वाशिम जिल्ह्यात २४0 तर उर्वरीत अकोला जिल्ह्यात अशा एकून एक हजार संस्था असल्याची माहिती आहे. संस्थेची नोंदणी करायची अन् अनुदान लाटायचे, या भूमिकेतून हजारो संस्था अस्तित्वात आल्या. अशा संस्थांना आवर घालण्यासाठी सहकार विभागाने मोहीम हाती घेतली आहे. राखीव गटातील संस्थांना राज्य व केंद्र सरकारकडून विविध मार्गांनी अनुदान मिळते. जिल्हा बँका, दूध संस्थांसह जिल्हा व तालुकास्तरीय संस्थांच्या निवडणुकीत थेट संस्थांच्या प्रतिनिधींना म तदानाचा हक्क असतो. त्यामुळे अधिकाधिक ठरावधारक आपल्या ताब्यात असावेत, यासाठी राजकीय मंडळ नेहमीच प्रयत्न करतात. त्यामुळे ग्रामीण भागात दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, पाणी पुरवठा संस्थांची दुकानदारी जोरात सुरू आहे. वास्तविक अशा संस् थावर सहकार विभागाने नियमित कारवाई करावी असा नियम असताना सहकार विभागही राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करण्याची टाळाटाळ करते. सध्या सहकार विभागात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहात आहे. लवकरच मुदत झालेल्या सहकारी संस् थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. वर्गवारीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणूका नंतर पाच वर्षांत सहकार विभागाला आवश्यक प्रक्रियासाठी प्रतिसाद न देणार्‍या संस्थांवर रितसर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सुत्राने दिली.