शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल!

By admin | Updated: September 12, 2016 02:56 IST

वाशिम येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन.

वाशिम, दि. ११ : कापूस, सोयाबीन उत्पादकांसह सर्व शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही युती शासनाला जाग येत नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वाशिम येथील जिजाऊ सभागृहात रविवारला पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख, पक्ष निरीक्षक बसवराज पाटील, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली ठाकूर, युवा सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, श्याम देवळे, डॉ. भगवानराव गोटे, माधवराव अंभोरे, सुनील पाटील, बाबाराव खडसे, पांडुरंग ठाकरे, माजी सभापती इम्रान कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन खडसे, संदीप दहात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पटेल म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळामध्ये सोयाबीन, कापूस इत्यादी शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा मार्केटचे भाव जास्त असायचे. यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर सुधारला होता. युती शासनाच्या काळामध्ये हमी भावापेक्षा मार्केटच्या भावामध्ये प्रचंड घसरण झाली. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांना व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार शासनाला जागे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. वेगळ्या विदर्भाबद्दल पटेल म्हणाले, की जनतेचा पाठिंबा असल्यास वेगळ्या विदर्भाला आमचा मुळीच विरोध राहणार नाही. वेगळ्या विदर्भामुळे जनतेचे हित होत असेल, तर नक्की आम्ही विदर्भावाद्यांच्या पाठीशी राहू. दरम्यान, इतर मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटनेसाठी मतभेद विसरून काम करण्याचे आश्‍वासित केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी, तर आभार डॉ. भगवानराव गोटे यांनी केले. यावेळी सभागृहात हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.