शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये विसर्जन सोहळ्यात हरीद्वारच्या कलामंडळानं वेधलं लक्ष; ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 19:02 IST

शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला

ठळक मुद्देशहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला या मंडळाने धार्मिक कथांवर आधारित नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं.

वाशिम, दि. 5-  शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. या मंडळाने धार्मिक कथांवर आधारित नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधलं. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध मंडळांनी ढोल, ताशे, कलापथकांसह विविध कार्यक्रम घेतले असतानाच नगराध्यक्ष अशोक हेडा आणि त्यांच्या परिवाराने गतवर्षीप्रमाणेच यंदाही हरीद्वार येथील शिवमहिमा जागरण मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.  या मंडळाने महा रासलिला, मयुर नृत्य, वृदांवनातील फुलांची होळी, शिवपार्वती नृत्य, तसेच महाकाली तांडव अशी विविध प्रकारची नृत्यं सादर करून सर्वांची मनं जिंकली. या मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो महिला, पुरुष भाविकांनी गर्दी केली होती. 

विसर्जन मिरवणुकीत एकूण ३५ गणेश मंडळांचा सहभाग शहरात सकाळी ९ वाजेपासून ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर सर्वच मंडळांचे गणपती दुपारी २ वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीत सामील झाले. शहरातील ३५ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सकाळी ९ वाजता स्थानिक शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण आणि अभिवादन करून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.  यावेळी खासदार भावना गवळी, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, एसडीपीओ प्रियंका मिना, होम डीवायएसपी किरण धात्रक, नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, मुख्याधिकारी गणेश शेट्टे, वाशिमचे ठाणेदार विजय पाटकर, नगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उज्ज्वल देशमुख आदिंची उपस्थिती होती. यंदा विसर्जन मिरवणुक सोहळ्यात प्रथम स्थान मिळविण्याचा मान शिवशंकर गणेश मंडळाला मिळाला. या विसर्जन सोहळ्यात युवतींचा समावेश असलेल्या मंडळाने पारंपरिक भगवे फेटे बांधून सीनेगीतांसह भावगीतांवर सादर केलेले नृत्य सर्वांचे लक्ष वेधत होते. काही मंडळांनी लेझीम पथकांचा कार्यक्रमही ठेवला होता. संपूर्ण विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल, ताशांच्या गजर ऐकायला मिळाला.