शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतला कुलूप; रिकाम्या हाती परतले चौकशी अधिकारी!

By admin | Updated: March 31, 2017 20:01 IST

पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिवाबाबत आर्थीक व्यवहारातील गैरप्रकाराची तक्रारीवरुन अधिकारी चौकशीसाठी गेले होते. ग्रामपंचायतला कुलूप लागलेले असल्याने चौकशी अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले.

पार्डी ताड : मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिवाबाबत आर्थीक व्यवहारातील गैरप्रकाराची तक्रारीवरुन अधिकारी चौकशीसाठी गेले होते. ग्रामपंचायतला कुलूप लागलेले असल्याने चौकशी अधिकाऱ्यांना खाली हात परतावे लागले.पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सचिव दिपा सुर्वे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पार्डी ताड येथील ग्रामपंचायत सदस्य विजय लांभाडे, भानुदास गावंडे, गजानन टोंचर यांनी केली होती. त्यांनी तक्रारी म्हटले होते की, ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जमा खचार्बाबत तसेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेबाबत व ग्रामसभेबाबत लेखी माहिती मागीतली असता सचिवांच्यावतिने टाळाटाळ केल्या जाते. तसेच ते रुजू झाल्यापासून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. त्याकरिता तेराव्या वित्त आयोग, चौदावा वित्त आयोग , तंटामुक्ती पुरस्कार प्राप्त बक्षिस , ग्रामपंचायत घर टॅक्स, पाणी पट्टी वसुली इतर निधीची संपूर्ण ग्रामपंचायत रेकॉर्डची तपासणीची मागणी केली होती. या तक्रारीनुसार पंचायत समिती स्तरावरुन पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आर. के. राऊत, विस्तार अधिकारी येवतकर गावात चौकशी करीता गेले असता ग्रामपंचायतला कुलूप आढळून आले. त्यामुळे अधिकाऱ्याना चौकशी न करताच खाली हात परतावे लागले. ---------------------

आमच्याकडे प्राप्त तक्रारीनुसार ग्रामपंचायत सचिव यांच्याचौकशीकरिता पार्डी ताड येथे गेले असता तेथे ग्रामपंचायतला कुलूप आढळून आले. यामुळे या प्रकरणाची चौकशी होवू शकली नाही.आर .के. राऊतविस्तार अधिकारी, पं .स. मंगरुळपीर