शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काजळेश्वर येथे रस्त्यावरील तुंबलेल्या पाण्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने व्यवस्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन करावे तसेच साथरोग लक्षात घेता धूर फवारणी करावी-जनशक्ती प्रहारची मागणी वार्ताहर काजळेश्वर उपाध्ये : गत ...

ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन करावे तसेच साथरोग लक्षात घेता धूर फवारणी करावी-जनशक्ती प्रहारची मागणी

वार्ताहर

काजळेश्वर उपाध्ये : गत दोन दिवस आलेल्या संततधार पावसाने काजळेश्वर येथील अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून, रस्त्यावर तलावाचे रूप दिसत होते. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी व्यवस्थापन मोहीम हाती घेऊन साथरोग लक्षात घेता धूर फवारणी करावी अशी मागणी प्रहार

जनशक्ती संघटनेने केली आहे.

वृत्त असे की, गत सोमवार, मंगळवारला काजळेश्वर येथे संततधार पाऊस आला. या पावसाने

उमा नदीला महापूर आला. नदी,नाल्याकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले. तर गावात ठिकठिकाणी पाणी तुंबले.पाणी वाहून न गेल्याने काही काळ तेथे पूरसदृशस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात गोठ्यात पाणी घुसले. काहींच्या घराच्या भिंती पडल्यात त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. पाणी व्यवस्थापन कार्य ग्रामपंचायतीने हाती घेऊन गावात पाणी तुंबू नये, रोडच्या नाल्याचे काम हाती घ्यावे तसेच सततच्या पावसाने मच्छराचा कहर सुरू झाला त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे साथरोग

सुरु झाले तेव्हा गावात ग्रामपंचायत प्रशासनाने धूर फवारणी करावी अशी मागणी जनशक्ती प्रहार संघटनेचे सेवक प्रदीप उपाध्ये,महादेव जाधव, सोनुभाई आदींनी केली आहे.