शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

भिंत कोसळल्याने मुलगी गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

वाशिम : पुरातनकालीन मातीची भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. पुढील ...

वाशिम : पुरातनकालीन मातीची भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. पुढील उपचारार्थ या मुलीला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे घरात पाणी शिरणे, भिंतीची पडझड आदी घटना घडत आहेत. अडोळी येथे बुद्ध विहाराच्या सभोवताली पुरातनकालीन मातीची भिंत आहे. बुद्ध विहाराच्या मागच्या बाजूला प्रवीण किसन पडघान हे आपल्या कुटुंबासह राहतात. प्रवीण पडघान यांची पत्नी कविता आणि १० वर्षांची मुलगी परी या दोघी मायलेकी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी जात असताना, अचानक परी हिच्या अंगावर भिंत कोसळली. यामध्ये ती पूर्णत: बुजून गेल्याने कविता पडघान यांनी आरडाओरड करताच, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळ गाठले. माती उकरून गंभीर जखमी अवस्थेत परीला बाहेर काढण्यात आले. यावेळी ती बेशुद्धावस्थेत असल्याने तातडीने उपचारार्थ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले.

००००००

दानशूरांच्या मदतीची गरज!

प्रवीण पडघान यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, ते नागपूर येथील उपचार व राहण्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मुलीची मृत्यूशी झुंज सुरू असून, उपचाराच्या खर्चासाठी पडघान यांना दानशूरांच्या मदतीची गरज आहे.