शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांतील गणेशाेेत्सव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST

कोरोनाची येऊ घातलेली तिसरी लाट लक्षात घेता एसडीपीओ यशवंत केडगे व आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील तायडे यांनी केलेल्या ...

कोरोनाची येऊ घातलेली तिसरी लाट लक्षात घेता एसडीपीओ यशवंत केडगे व आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील तायडे यांनी केलेल्या समाजप्रबोधन व मार्गदर्शनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव बंद ठेवून गणेशाची घरगुती पूजा करण्याचा निर्णय ५० गावच्या गणेश मंडळांनी घेतला आहे. यामुळे डीजे मिरणुका व इतर बाबींवर होणारा लाखोंचा खर्च बचत होऊन हा खर्च कोरोनाविरुद्धच्या लढाईवर खर्च करण्याचा निर्णय या गणेश मंडळांनी घेतला आहे.

कोरोनाची साखळी तोडून त्याला आपल्या गावाजवळ न येऊ देण्यासाठी सार्वजनिक उत्सव थांबविणे हाच एकमेव पर्याय आहे, असे आसेगावचे ठाणेदार तायडे यांना वाटले; परंतु हे शक्य नाही म्हणून त्यांनी एसडीपीओ यशवंत केडगे यांचे मार्गदर्शन घेतले. ५० गावच्या गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन मार्गदर्शन केल्याने या गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करण्यात आला.

-----------------------------------

आपण केवळ मार्गदर्शन केले; परंतु आसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गणेश मंडळांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभक्ती जागृत करीत सार्वजनिक उत्सवाऐवजी घरगुती उत्सव करण्याचे मान्य करून कोरोना साखळी तोडण्यासाठी सज्ज झाले. तरुणाई या कार्यात सक्रिय झाल्याने परिवर्तन होणारच आहे.

य़शवंत केडगे

उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर

----------------------------------

शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नाही; परंतु कोरोना आपल्या हातात नाही म्हणून तरुणांनी सार्वजनिक उत्सव साजरे करून त्याला आमंत्रण देऊ नये. आपल्या आवाहनानुसार घरगुती पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ५० मंडळांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

स्वप्नील तायडे,

ठाणेदार आसेगाव पोलीस स्टेशन

आमच्या गणेशोत्सव मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून यावरील होणारा खर्च कोरोनाविरुद्धच्या लढाईत होणाऱ्या विविध बाबींवर खर्च करण्यात येणार आहे, तसेच निराधार व गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटून गणेशाचा प्रसाद त्यांना घरपोच देणार आहाेत.

विठ्ठल उकंडा महल्ले

अध्यक्ष, वीर भगतसिंग सार्वजनिक गणेश मंडळ, दाभडी