रोहणा येथे जुगारावर धाड; सात जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST2021-09-13T04:40:42+5:302021-09-13T04:40:42+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहणा येथे मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. गावातील अनेकांचे कुटुंब यामुळे ...

Gambling raid at Rohna; Action on seven people | रोहणा येथे जुगारावर धाड; सात जणांवर कारवाई

रोहणा येथे जुगारावर धाड; सात जणांवर कारवाई

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहणा येथे मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. गावातील अनेकांचे कुटुंब यामुळे देशोधडीला लागण्याची वेळ ओढवली होती. जुगार अड्डा बंद व्हावा, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. यासंदर्भात मिळालेल्या गोपनिय माहितीवरून मानोरा पोलिसांनी सापळा रचून जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी त्याठिकाणी जुगार खेळण्यात गुंग असलेले गंगाराम शालीकराम गरीबे, साहेबराव अजाबराव अंभोर, अविनाश रामराव राठोड, मनीष नामदेव लोखंडे, अविनाश प्रकाश आडे, विजय देवमन राठोड, वासुदेव पंजाबराव नाटकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधितांविरूद्ध मुंबई जुगार ॲक्टमधील कलम १२ (अ) नुसार कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे, बालाजी महल्ले, मयूरेश तिवारी यांनी कारवाईत सहभाग नोंदविला.

Web Title: Gambling raid at Rohna; Action on seven people