शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षक दल समस्यांच्या फे-यात

By admin | Updated: December 23, 2014 00:15 IST

वाशिम जिल्हा समादेशकाचे पद रिक्त; मुख्यालयाच्या इमारतीला जागा नाही, कर्मचा-यांची वाणवा.

वाशिम : सार्वजनिक उत्सव असो, निवडणूका असो अथवा मानव निर्मित आपत्ती प्रत्येक वेळी पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची धुरा सांभाळणारे जिल्ह्यातील गृहरक्षक दल आजमितीला लालफितशाहीत अडकले आहेत. सन २0१0 मध्ये निर्माण झालेल्या येथील गृहरक्षक दलाच्या कार्यालयाला इमारत मिळू शकली नाही. कार्यालयीन कर्मचार्‍यांची पदे, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य आदी बाबींचा येथे दुष्काळ पडला आहे. सन १९९८ ला अकोला जिल्ह्याचें विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा निर्माण झाला. त्यामुळे स्वाभाविकच जिल्हास्तरावर आवश्यक असणारी कार्यालये येथे थाटण्यात आली. गृहरक्षक दलाचे मुख्यालय मात्र याला अपवाद ठरले. सन २0१0 पर्यंत जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचा कारभार अकोल्यातून चालायचा. सन २0१0 ला येथे कार्यालय सुरू करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे येथील जिल्हा समादेशाचा पदभार सोपविण्यात आला होता. गृहरक्षक दलाच्या येथील कार्यालयाला तब्बल चार वर्षापासून कायमस्वरूपी समादेशक मिळाले नाहीत. सद्यस्थितीत प्रभारी पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. वाशिमच्या होमगार्डाची जबाबदारी आहे. वाशिम जिल्हयात सद्यस्थितीत ३८५ गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्य बजावत असून यामध्ये २0४ पुरुष तर १८१ महिलांचा समावेश आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या एका खोलीत सद्या गृहरक्षक दलाचे कार्यालय सुरू आहे. गृहरक्षक दलाला ईमारत तथा प्रशिक्षणासाठी जागा नसल्यामुळे कर्तव्य बजावणार्‍या गृहरक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहे.