शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या खाद्यपदार्थ विक्रीचा घातक ट्रेड

By admin | Updated: July 22, 2014 22:07 IST

नागरिकांच्या जिवित्वाशी खेळ, औषधी प्रशासनाचे साफ दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाशिम : शहरातील विविध भागात खुलेआम खाद्यपदार्थाची विक्री सुरू आहे. अनेक खवय्ये जिभेचे चोचले पुरविण्यासाठी या खाद्यपदार्थावर ताव मारताना दिसतात. परंतु अस्वच्छ , घाण परिसरात नियमांचे उल्लंघन करून विकले जाणारे हे खाद्य पदार्थ रोगराईला आमंत्रण देत आहेत. अन्न, औषधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. गोरगरिबांच्या सोयीसाठी असलेले जिल्हा सामान्य रूग्णालय, पाटणी चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफीस चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका, लाखाळा, शिवाजी चौक, आंबेडकर चौकासह शहरातील विविध गजबजलेल्या परिसरात खुलेआम खाद्यपदार्थाची विक्री होते. शहरातील हॉटेल्स- रेस्टाँरेंटमध्ये तुंडूब गर्दी असते. नियमानुसार हॉटेल किंवा उघडयावर होणार्‍या खाद्य पदार्थाची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासन विभागाची आहे. परंतु पावसाळा सुरू झाल्यावरही प्रशासनाने कोणतीच तपासणी मोहीम हाती घेतलेली नाही. परिणामी अस्वच्छ खाद्यपदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विविध आजार बळावत आहेत.

** गॅस्ट्रो, काविळसह अतिसाराची शक्यता

उघडयावरील दूषित खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे विविध आजार बळावतात. पावसाळयात या आजारांचा प्रसार अधिक वेगाने होतो. प्रदूषित पाणी वापरल्यास टायफाईड, कॉलरा, काविळ, गॅस्ट्रो आदींचा प्रादूर्भाव होऊ शकतो. इतकेच नव्हे तर या शिळया व दूषित खाद्य पदार्थामुळे अतिसारही होतो. कित्येकदा अन्नातून विषबाधा देखिल होते. त्यामुळे निदान पावसाळयात तरी उघडयावरील दूषित व अस्वच्छ खाद्यपदार्थ टाळायला हवे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व्ही.डी. क्षिरसागर यांनी लोकमतला दिली.

** नोकर, कर्मचार्‍यांची तपासणी बंधनकारक

हॉटेलमध्ये काम करणारे नोक आणि कर्मचार्‍यांची शारीरिक स्वच्छता, आरोग्य आदीची तपासणी हॉटेल मालकाने केली किंवा नाही याची चौकशी करण्याचा अधिकार अन्न , औषध प्रशासन कार्यालयाला आहे. त्यामुळे ही तपासणी करणे गरजेचे आहे.