शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पाच्या किना-यावर प्रकल्पग्रस्तांचे उपोषण

By admin | Updated: September 22, 2015 01:57 IST

३५ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांचा लढा; विविध मागण्यांचा समावेश.

मंगरूळपीर (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या चार प्रमुख मागण्यांसाठी सोनल प्रकल्पाच्या किनार्‍यावर २१ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषाणास सुरुवात केली आहे. १९७९ साली सोनल प्रकल्पाच्या निमित्तीस सुरुवात झाली होती. त्यावेळी अवघ्या हजार रुपये दराने शेतजमिनी अजिर्त केल्या होत्या. आमच्या पालकांनी विरोध केला असता, तुमच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय नोकरीवर घेतले जाईल, अशी त्यांची बोळवण करण्यात आली. ३५ वर्षे उलटून गेली असतानाही कुटुंबातील एकाही व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला फक्त प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दिले. आजघडीला आम्ही वयातून बाद होण्याच्या स्थितीला आलो आहोत. शासनाच्या अडेलतट्ट धोरणामुळे आम्हा सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही हलाखीचे जीवन जगत आहोत. यापूर्वीसुद्धा शासनास निवेदन देऊन उपोषण केले होते; मात्र काहीच फायदा झाला नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत शासनाकडुन कुठल्याच प्रकारचे सकारात्मक उत्तर मिळाले नसून, तशा हालचालीसुद्धा दिसून येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची सभा घेऊन शासनाच्या अडेलतट्टू धोरणांच्या विरोधात २१ सप्टेंबर रोजीपासून बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला होता. प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेत तात्काळ विनाअट सामावून घ्यावे, प्रकल्पग्रस्तांची स्पर्धा परीक्षा ही नामधारी करावी, व्यवसायासाठी १५ लाख रुपये रोख व बाजारपेठेच्या ठिकाणी विनामूल्य जागा द्यावी आणि नवीन पुनर्वसन कायद्याप्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात, या मागण्यांकरिता महादेव अढाव, संदीप वानखेडे, सुदेश पाचपिले, मंगेश वानखेडे, गजेंद्र वानखेडे, सचिन वानखेडे, नितेश वानखेडे, महेश वानखेडे, राजेश वानखेडे, विकास वानखेडे व सुभाष भगत अशा ११ प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास २७ सप्टेंबर रोजी जलसमाधी घेण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.