शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जाणार संपावर!

By admin | Updated: June 1, 2017 01:56 IST

वाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टणका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टणका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतने ठरावदेखील घेतला. तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.उत्तर प्रदेश या राज्यामध्ये शासनाने संपूर्ण कर्जमाफी केलेली असताना महाराष्ट्र शासन मात्र कर्जमाफीच्या प्रश्नासंदर्भात उदासीन आहे, असा आरोप टणका येथील शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाशिम तालुक्यातील गट ग्रामपंचायत टणका, सोनगव्हाण, झोडगा येथे ३० मे २०१७ रोजी झालेल्या मासिक ग्रामसभेत सर्व सदस्यांच्या अनुमोदनाने गट ग्रामपंचायत टणका, सोनगव्हाण व झोडगा येथील शेतकरी १ जूनपासून बेमुदत संप पुकारणार, असा निर्धार करण्यात आला. सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव द्यावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज पुरवठा मिळावा, ठिंबक व तुषार सिचंनासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर पेन्शन लागू करावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी संपावर गेला, तर काय होऊ शकते, याचे गांभीर्य इतरांसह सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आता शेतकरीच संपावर जाणार, असा निर्धार टणका, सोनगव्हाण, झोडगा येथील शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या उपरोक्त मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी सरपंच गोदावरी राजेश मस्के, ग्रामपंचायत सदस्य संजय गव्हाणे, सागर शिंदे, शंकर कालापाड, विजय मार्कड, रवींद्र शिरसाट या शेतकऱ्यांनी केली.