‘एनडीए’मध्ये निवड झालेल्या शेतकरी पुत्र अभिषेकचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:18+5:302021-09-12T04:47:18+5:30

रिसोड : तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी पुत्र अभिषेक दिलीप गाडे याची युपीएससीमार्फत घेतल्या गेलेल्या (एनडीए) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या परीक्षेत ...

Farmer's son Abhishek felicitated in NDA | ‘एनडीए’मध्ये निवड झालेल्या शेतकरी पुत्र अभिषेकचा सत्कार

‘एनडीए’मध्ये निवड झालेल्या शेतकरी पुत्र अभिषेकचा सत्कार

रिसोड : तालुक्यातील पवारवाडी येथील शेतकरी पुत्र अभिषेक दिलीप गाडे याची युपीएससीमार्फत घेतल्या गेलेल्या (एनडीए) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या परीक्षेत १४६ व्या तुकडीत निवड झाल्याने रिसोड शहराच्यावतीने १० सप्टेंबर रोजी विश्वा लॉन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हाेते.

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल पाटील ढोणे तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी कृषी सभापती विश्वनाथ सानप, कारंजा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता सुधाकरराव देशमुख, प्रतिष्ठित व्यापारी राजूभाऊ तोष्णीवाल, जनार्धन गाडे, संजय पवार, दिलीप गाडे आदी उपस्थित होते. यावेळी अभियंता सुधाकरराव देशमुख यांनी अतिशय लहान वयात वेगळी वाट पकडणारी मुले भविष्यात यशस्वी होतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे एनडीएसाठी निवड झालेला अभिषेक गाडे हा आहे, असे सांगितले. माजी कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी अभिषेकचे यश जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष खुशाल पाटील ढोणे यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. एनडीएमध्ये अभिषेक गाडेला सेनादल मिळाले आहे. पुढील प्रशिक्षण खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये होणार आहे. एनडीएमध्ये झालेल्या निवडीने अभिषेक गाडेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर कहाकर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश सोनुने यांनी केले.

100921\5259img_20210910_212457.jpg

एनडीएत निवड झालेल्या अभिषेक गाडेचा सत्कार करतांना मान्यवर

Web Title: Farmer's son Abhishek felicitated in NDA