शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बालकांची तपासणी, महिलांच्या लसीकरणावरही भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

वाशिम : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महोत्सवाचा शुभारंभ झाला असून, यादरम्यान कुपोषित बालकांची तपासणी, अंगणवाडी सेविकांचे १०० टक्के कोविड ...

वाशिम : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पोषण महोत्सवाचा शुभारंभ झाला असून, यादरम्यान कुपोषित बालकांची तपासणी, अंगणवाडी सेविकांचे १०० टक्के कोविड लसीकरण, गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी कोविड लसीकरण यासह विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी सांगितले.

राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. यंदाही पोषण महोत्सवावर कोरोनाचे सावट आहे; परंतु कोरोनाविषयक नियमांचे पालन करून जिल्ह्यात अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषण माह अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. अंगणवाडी केंद्र, शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आदी ठिकाणी सार्वजनिक जागांवर वृक्षारोपण करून पोषण वाटिका तयार करणे, परसबाग तयार करणे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गरोदर महिलांसाठी स्तनपानविषयक समुपदेशन, पोषण आहार व लोह याबाबत समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी पोषण आहारबाबत घोषवाक्य तयार करण्यासाठी स्पर्धा घेणे, मातृत्व वंदन सप्ताह साजरा करणे तसेच अंगणवाडी सेविकांचे १०० टक्के कोविड लसीकरण, गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी कोविड लसीकरण यावर भर देण्यात आला आहे. अंगणवाडी केंद्रातील बालके आणि किशोरवयीन मुली यांचे आरोग्य पोषण या अनुषंगाने ३० सप्टेंबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर अशा सहा प्रकल्प स्तरांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात पोषण महोत्सवांतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात असल्याचे संजय जोल्हे यांनी सांगितले.

००००००००००००

कुपोषित बालकांच्या आरोग्याला प्राधान्य

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सॅम श्रेणीतील बालकांचा शोध घेणे आणि पोषण आहाराचे वाटप करणे, कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी, नियमित औषधोपचार यावर भर देण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात पोषण महोत्सव प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी सांगितले.