शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही श्रीगणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीस मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात संबंधित अधिकारी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात संबंधित अधिकारी व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, राहुल जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. ग्रामीण भागात एक गाव एक गणपती तसेच शहरी भागात एक वाॅर्ड एक गणपती यासारखे उपक्रम राबवावेत. यंदाही गणेश आगमन व गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी राहणार असून कोणत्याही सार्वजनिक मंडळाने अथवा घरगुती गणपतीच्या आगमनाप्रसंगी मिरवणूक आयोजित करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

..........................

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करा

कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जनजागृती करावी. मंडळांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबिरे, कोरोना चाचणी शिबिरांचे आयोजन करून १८ वर्षांवरील पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी तसेच कोरोना चाचण्यांसाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.