शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु राहणार अत्यावश्यक सेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारीत आदेश २० एप्रिलला जारी केला ...

वाशिम : कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीचा सुधारीत आदेश २० एप्रिलला जारी केला असून, त्यानुसार दवाखाने, मेडीकल्स वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. त्यानंतर दुकाने उघडी ठेवल्यास कोविड-१९ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदी लागू असतानाही, अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने परिस्थिती जैसे थे होती. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १८ एप्रिल रोजी कठोर पाऊल उचलत संचारबंदीच्या नियमात बदल करीत सुधारीत आदेश जारी केला. या आदेशानुसार मेडीकल व दवाखाने वगळता अत्यावश्यक सेवेतील उर्वरीत सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत केवळ चार तासांसाठी सुरू ठेवता येणार होती. मात्र, राज्य शासनाने सुधारीत आदेश जारी करून दवाखाने, मेडीकल्स वगळता उर्वरीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मंगळवार, २० एप्रिल रोजी संचारबंदीचा आणखी सुधारीत आदेश जारी केला. यानुसार दवाखाने, मेडीकल्स २४ तास सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवेतील उर्वरीत दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहतील. अत्यावश्यक बाबीतील सर्व हार्डवेअर्सची दुकाने व कृषि संबंधित सर्व दुकाने, आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषि संबंधित साहित्याची आवश्यकता असेल त्यांनी संबंधित दुकानदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे मागणी नोंदवून संबंधित ग्राहकाने स्वत: ही वस्तू दुकानातून घेवून जावी. केवळ त्या वेळेपुरते दुकान उघडता येईल. इतर कोणत्याही परिस्थितीत दुकानदार यांनी दुकानातून मालाची विक्री करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्याविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही दिला. नागरिकांनी संचारबंदीच्या सुधारीत आदेशाचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.

००००००००

बॉक्स

दूध संकलन सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच

दुध संकलन व विक्रीकरिता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अशी वेळ दिली आहे. याशिवाय ह्यहोम डिलिव्हरीसाठी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा, त्यासंबंधित इतर सेवा २४ तास सुरु राहतील. स्थानिक खाजगी वाहतूक सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

००००

बॉक्स

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये २४ तास सुरू !

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा, नगरपालिका व विद्युत वितरण कंपनीची कार्यालये २४ तास सुरु राहतील. जिल्ह्यातील सर्व कायालये, बँक, एटीएम, विमा कार्यालये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील.

०००००

बॉक्स

पेट्रोल विक्रीला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच मुभा

शहरातील व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंपावर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच पेट्रोल विक्रीला मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, रुग्णवाहिका व मालवाहतुकीची इतर वाहने यांना नियमितरित्या डिझेलची आवश्यकता असल्याने या पंपांवर डिझेल विक्री पूर्वीप्रमाणे नियमित सुरु राहील. मात्र सकाळी ११ वाजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल विक्री करता येणार नाही.

००००

बॉक्स

प्रतिबंधित क्षेत्रातील इतर दुकाने बंद !

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला व फळांची दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरु राहतील, इतर सर्व दुकाने बंद राहतील. परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांना १४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार कोरोना सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.