ध्वनिक्षेपक वापराचा कालावधी दोन तासांनी वाढवला!

By Admin | Updated: September 3, 2016 02:05 IST2016-09-03T02:05:57+5:302016-09-03T02:05:57+5:30

रात्री १0 ऐवजी १२ पर्यंत सूट : गणेशभक्तांमध्ये आनंद.

The duration of the loudspeaker usage has increased by two hours! | ध्वनिक्षेपक वापराचा कालावधी दोन तासांनी वाढवला!

ध्वनिक्षेपक वापराचा कालावधी दोन तासांनी वाढवला!

वाशिम, दि. २: गणेशोत्सवादरम्यान उत्सव काळातील चार दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरासाठी रात्री १0 ऐवजी १२ वाजेपर्यंंत सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी संबंधितांना सूचना दिल्या. या निर्णयामुळे जिल्ह्यातील गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेनुसार, गणेश स्थापनेनिमित्त ५ सप्टेंबर, गौरी विसर्जनानिमित्त ९ सप्टेंबर, गणेश उत्सवाच्या सातव्या दिवसानिमित्त ११ सप्टेंबर व अनंत चतुर्दशीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरासाठी सूट देण्यात आली आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी. तद्वतच रात्री १२ वाजेनंतर कुणीही ध्वनिक्षेपक अथवा ध्वनिवर्धकचा वापर करू नये. याउपरही आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: The duration of the loudspeaker usage has increased by two hours!