शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे मानधन दहा महिन्यांपासून थकित

By admin | Updated: January 6, 2015 00:37 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या १२१ तर इतर ४६ शाळांमधील प्रकार.

मंगरुळपीर ( जि. वाशिम): शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेत, कंत्राटी पद्धतीनुसार शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांना १0 महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती आहे. भारतात वाढत्या वयांच्या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या आढळते. याचा परिणाम प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणावर होत असून, भारत सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यात अडथळे येत आहेत. हे लक्षात घेऊन भारत सरकारने मुलांचे कुपोषण टाळून त्यांची शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सुरुवातीला शाळांतील शिक्षकांकडूनच पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी पार पाडली जायची; परंतु गत काही दिवसांपासून या योजनेची जबाबदारी कंत्राटी पद्धतीनुसार महिला बचत गटांना देण्यात येत आहे. शासनाकडून देण्यात येणारे धान्य शिजविण्यासाठी लागणारे इतर साहित्य त्यांना स्वत: खरेदी करावे लागते. यामध्ये इंधन, पोषण आहारात टाकण्यासाठी आवश्यक पुरक साहित्य खरेदीसाठी त्यांना नियमित रक्कम आणि मानधन मिळणे आवश्यक आहे; परंतु गत १0 महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे काम करणार्‍या या महिलांना ही रक्कम आणि मानधनच मिळाले नाही. त्यामुळे शालेय पोषण आहारासंदर्भातील कामे करणे त्यांना कठीण झाले आहे. पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी पुढे चालविण्यासह स्वत:च्या उदरभरणाचा प्रश्नही त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. मंगरुळपीर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२१ आणि इतर ४६ अशा एकूण १६७ शाळांमधील शालेय पोषण आहाराचे काम करणार्‍या महिलांना १0 महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याची माहिती आहे. संबंधित अधिकार्‍यांच्या कानावर वारंवार माहिती पोहोचवून, मागणी करूनही त्यांना मानधन मिळल नसल्यामुळे शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांमध्ये रोषाचे वातावरण आहे. पंचायत समितीकडे वेळेवर निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे शालेय पोषण आहाराच्या कामाचे मानधन देणे शक्य झालेले नाही. येत्या काही दिवसांत शालेय पोषण आहार शिजविणार्‍या महिलांना दोन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी एस.व्ही. माने यांनी स्पष्ट केले.