शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची कामगिरी मंदावली

By admin | Updated: October 25, 2014 00:10 IST

वाशिम जिल्ह्यातील परिस्थिती : जिल्ह्यात एकूण ९६ वन व्यवस्थापन समित्या.

वाशिम : वनसंपदेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागाला गावपातळीवर ह्यविश्‍वासाचा सोबतीह्ण म्हणून वाशिम जिल्ह्यात ९६ संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे गठण करण्यात आले आहे. मात्र, शासनस्तरावरून पुरेशा प्रमाणात निधी येत नसल्यामुळे या समित्यांचे कार्यही आपसूकच मंदावले असल्याचे वास्तव समोर येत आहे. वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे, वनक्षेत्रातील किल्ले व निसर्गरम्य ठिकाणांचे जतन करणे, पर्यटनस्थळांना भेटी देणार्‍या पर्यटकांवर नियमन करणे आदी कर्तव्य पार पाडण्यासाठी महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आलेली होती. मात्र, समितीला फारसे अधिकार व ग्रामसभेची साथ नसल्याने कर्तव्य बजाविण्यात अडचणी येत होत्या. या पृष्ठभूमीवर संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या शासन निर्णयात बदल करून नवीन नियमाचा जन्म झाला. महसूल व वनविभागाने जारी केलेल्या या नवीन नियमाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीची उद्दिष्ट्ये, गठण, कर्तव्य व जबाबदार्‍या, समितीला होणारे फायदे, अधिकार, ग्रामसभेचे अधिकार आदी बाबी स्पष्ट केल्या आहेत. वनक्षेत्र असलेल्या गावातील वन समित्यांना ग्रामसभेची जोड देण्यात आली आहे. या समितीला पर्यटकांकडून उपद्रव शुल्क व प्रवेश शुल्क वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत.तसेच अवैध वृक्षतोड, चराई, वणवा, शिकार अशा प्रकरणी समितीला दंडनिहाय कार्यवाही करण्याचे अधिकारदेखील मिळाले आहेत. तसेच विविध प्रकारच्या उपक्रमांसाठी शासनाकडू निधीही मिळत असतो. जिल्ह्यात वाशिम परीक्षेत्रांतर्गत ४६ समित्या होत्या. मात्र, वाशिममधून मेडशी या परीक्षेत्राची नव्याने निर्मिती झाल्याने वाशिममध्ये २२ आणि मेडशी परीक्षेत्रात २४ समित्या विभागल्या गेल्या आहेत. कारंजा परीक्षेत्रांतर्गत जवळपास ५0 समित्यांचे गठण झालेले आहे. गठण झाल्यानंतर जवळपास २0 समित्यांनी सुरूवातीला अवैध वृक्षतोड, चराई, शिकार आदी गैरप्रकारांना आळा घालण्यात मोलाची कामगिरी बजावली. वाशिम परीक्षेत्रातील चार ते पाच समित्यांनी विविध उपक्रमही राबविले. मात्र, शासनाकडून निधीच मिळाला नसल्यामुळे समित्यांच्या उत्साहावर विरजन पडले. आताही समित्यांसाठी शासनस्तरावरून निधीच आला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे समित्यांची कामगिरी अधिकच मंदावली आहे.