रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST2021-06-18T04:28:51+5:302021-06-18T04:28:51+5:30

------------------------ वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित वाशिम आसेगाव : परिसरात मंगळवार १५ जून रोजी रात्री वादळीवारा सुटला. यामुळे ...

Drivers exercise due to potholes on the road | रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

------------------------

वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित

वाशिम आसेगाव : परिसरात मंगळवार १५ जून रोजी रात्री वादळीवारा सुटला. यामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. तथापि, काही वेळानंतरच हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

-----

कामगारांना रोजगार देण्याची मागणी

वाशिम : इंझोरी परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत; मात्र परिसरात कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच व पोलीस पाटलांनी गुरुवारी केली.

---------

कामरगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : आगामी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कामरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

-------

Web Title: Drivers exercise due to potholes on the road