शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे ...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लीटर पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते; अन्य ऋतूंमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात जवळपास आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

........................

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे विविध स्वरूपातील संसर्गजन्य आजार पसरतात. या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार जडण्यासोबतच सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळे काविळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात.

...............

पाणी उकळून प्यायलेले बरे

उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कोमट पाणी अनेक आजारांपासून शरीराला सुरक्षित ठेवते. सकाळच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर अनशापोटी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एका तासाने कोमट पाणी प्याल्याने कफ व पोटाचे विकार नाहीसे होतात.

..................

आजाराची लक्षणे

दूषित पाणी प्याल्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शाैचास होण्याचा विकार जडू शकतो. त्यास अतिसार म्हणतात.

दूषित पाणी तसेच अन्नपदार्थांमधून पसरणारी कावीळ वर्षभर असते ; मात्र पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारात वाढ होते.

उलटी आणि जुलाब यासारखी लक्षणेही दूषित पाण्यातून दिसून येतात. त्यास गॅस्ट्रो म्हणून संबोधण्यात येते.

पोलिओ आणि विषमज्वर यासारखे आजारही दूषित पाणी पिण्यात आल्याने होतात.

....................

वाशिमकर दररोज पितात १० दलघमी पाणी

वाशिम तालुक्यातील केकतउमरा गावानजिकच्या एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना नळाव्दारे १० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा केला जातो. दरडोई १२५ लीटर पाणी पुरविण्यात येते. पाणी शुद्धीकरणाची रीतसर प्रक्रिया राबवूनच निर्जंतुक झालेले पाणी नळाव्दारे पुरविण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे पंकज सोनोने यांनी दिली.