शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या चाैकशी अहवालाबाबत जिल्ह्यात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

नंदकिशोर नारे वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत. परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. परंतु गत ...

नंदकिशोर नारे

वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत. परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. परंतु गत महिन्यापासून दाेन वेळ ईडीचे अधिकारी जिल्ह्यात येऊन गेल्याने त्यांनी केलेल्या चाैकशीत काय आढळते, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगताहेत. या चर्चांना विराेधी पक्ष चांगलेच खतपाणी घालताना दिसून येत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यतत्पर, विकास कार्य खेचून आणणाऱ्या दाेन लाेकप्रतिनिधींनी माेठ्या प्रमाणात घाेटाळा केल्याचा आराेप - प्रत्याराेप केला जात आहे. यामध्ये खासदार भावना गवळी यांनी आपल्या संस्थांमध्ये १०० काेटी रुपयांचा, तर आमदार पाटणी यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी - विक्री व्यवहारात ५०० काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचे म्हटले जात आहे. खा. भावना गवळी यांनी १०० काेटीचा घाेटाळा केल्याची तक्रार भाजपाचे नेते किरीट साेमय्या यांनी संबंधितांकडे केली. त्यानुसार त्यांची ईडीकडून चाैकशी केली जात आहे. या चाैकशीबाबत शिवसैनिकांकडून निषेध नाेंदवून शिवसेना नेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सर्वत्र हाेत असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेत्यांचीच चाैकशी का?, भाजपच्या लाेकप्रतिनिधींवरही घाेटाळ्यांचे आराेप हाेत आहेत. त्यांची चाैकशी का केली जात नाही, असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात ईडीचे अधिकारी आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याने सर्वत्र याच घटनेबाबत चर्चा हाेत असून, पुढे काय हाेणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामध्ये दाेषींवर कारवाई निश्चित हाेईल, असा आत्मविश्वास भाजपा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे, तर शिवसैनिक ‘कर नही ताे डर कायका’ म्हणत आहेत. ईडीचा चाैकशी अहवाल जाे येईल ताे येईल. परंतु जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या काळातही जागाेजागी याचीच चर्चा हाेताना दिसून येत आहे एवढे मात्र नक्की.

...............

किरीट साेमय्या यांना सुरक्षा

ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आराेप करुन त्यांचा घाेटाळा उघडकीस आणण्याचे काम भाजपा नेते किरीट साेमय्या करीत असल्याने त्यांना धमक्या येत असून, सुरक्षेची मागणी केली हाेती. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. देगाव येथे त्यांच्या वाहनांवर शाई व दगडफेक झाली हाेती. केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. यामुळे अनेक प्रकरणे अधिक उजेडात येणार असल्याची चर्चा हाेत आहे.