देशमुख दाम्पत्यामुळे वाढली जिल्हा बँकेच्या निवडणूकीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:57 IST2021-02-20T05:57:22+5:302021-02-20T05:57:22+5:30

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वामनराव देशमुख हे ई-पगारदार नोकर पतसंस्था नागरी सहकारी बँक ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर ...

Deshmukh couple increased in District Bank elections | देशमुख दाम्पत्यामुळे वाढली जिल्हा बँकेच्या निवडणूकीत चुरस

देशमुख दाम्पत्यामुळे वाढली जिल्हा बँकेच्या निवडणूकीत चुरस

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वामनराव देशमुख हे ई-पगारदार नोकर पतसंस्था नागरी सहकारी बँक ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि अ ते ड व्यतिरिक्त इतर सभासद संचालक या पदासाठी, तर छायाताई देशमुख महिला प्रतिनिधी संचालक पदासाठी निवडणुक रिंगणात आहेत. सहकार क्षेत्रात स्व. अण्णासाहेब देशमुखांपासून देशमुख दाम्पत्यांंचे मोठे योगदान आहे. मागील अनेक वर्षापासून महानंदचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्षपद या माध्यमातून ते शेतकरी हितासाठी काम करीत आहेत. या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून छायाताई देशमुखदेखील शिक्षणासह ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट तयार करुन समाजकार्यात सक्रिय आहेत. समाजसेवेचा वसा घेतलेले देशमुख दाम्पत्य जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

Web Title: Deshmukh couple increased in District Bank elections