पुरात वाहून गेल्याने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: September 1, 2016 02:01 IST2016-09-01T02:01:03+5:302016-09-01T02:01:03+5:30

मानोरा तालुक्यातील गव्हा येथील घटना.

Death due to its passing in the flood | पुरात वाहून गेल्याने इसमाचा मृत्यू

पुरात वाहून गेल्याने इसमाचा मृत्यू

मानोरा (जि.वाशिम), दि. ३१: तालुक्यातील गव्हा येथील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने येथील एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश दीपला पवार (वय ५0) असे मृतकाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी पावसाने संततधार लावल्याने गव्हा येथील नाल्याला पूर आला. शेतमजूर प्रकाश दिपला पवार हे शेतातून परत येत असताना, नाला पार करत होते. पुराच्या पाण्याचा लोंढा आल्याने ते एक किमी अंतरापर्यंंंंत वाहून गेले. नागरिकांनी त्यांचा शोध घेऊन पाण्याबाहेर काढले आणि उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय मानोरा येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानोर्‍याचे मंडळ अधिकारी एम.बी. वाघमारे, मानोर्‍याचे तलाठी महादेव खंडारे, गव्हाचे तलाठी धोत्रे यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली.

Web Title: Death due to its passing in the flood