शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोहरादेवीत महंतासह ७ जणांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 00:53 IST

महंत कबीरदास महाराज व कुटुंबीयांनी यांनी २१ फेब्रुवारीला चाचणी केली होती.

मानोरा (जि. वाशीम) : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन केलेल्या  पोहरादेवी येथील सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये महंत कबीरदास महाराज व त्यांच्या कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. शिवाय गावातून गुरुवारी तब्बल १२३ जणांचे नमूने चाचणीसाठी गेले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.  

एरवी पोहरादेवी तालुक्यातून जितके नमूने चाचणीसाठी जातात, तितके एकट्या गावातून गेल्यामुळे तालुक्याची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट मोडवर आली आहे. २३ फेब्रुवारीच्या शक्तीप्रदर्शनानंतर तालुक्यातून २१९ नमूने चाचणीसाठी गेले आहेत. हा आकडादेखील नेहेमीपेक्षा मोठा असल्याने शक्तीप्रदर्शनातून कोरोना फैलाव झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 

महंत कबीरदास महाराज व कुटुंबीयांनी यांनी २१ फेब्रुवारीला चाचणी केली होती. त्यानंतरही ते मंगळवारी दिवसभर मंत्री राठोड व इतरांच्या निकट संपर्कात आले होते. गुरुवारी उघड झालेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांच्या कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणखी काही नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.

निवासी विद्यालयातील ४६ मुले बाधित 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे मतिमंद निवासी विद्यालयातील ४६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंत्रोळी येथील शाळा सुरू करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने बुधवारी चाचणी केल्यावर २१ विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी एकूण ४६ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडcorona virusकोरोना वायरस बातम्या