शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती गंभीर

By admin | Updated: April 10, 2015 02:10 IST

मंगरूळपीर येथील घटना; उपचारार्थ वाशिम येथे हलविले.

मंगरु ळपीर (वाशिम): : तालुक्यातील चकवा येथील रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्र मण हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर झाली असून, सदर महिलेला उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आल्याची माहिती गुरुवारी मिळाली. चकवा येथे रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी चकवा येथील काही लोकांनी सोमवारपासून मगरुळपीर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला आज पाचवा दिवस झाला तरी अद्यापही दखल घेण्यात आली नाही. उपोषण करणार्‍या पाच व्यक्तींपैकी वर्षा मनवर या महिलेची प्रकृती गंभीर बिघडल्यामुळे तिला मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी करण्यात आलेल्या उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. त्यामुळे या महिलेला वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चकवा येथील अतिक्रमणधारक व्यक्तींमध्ये चकवा गावचे पोलीस पाटीलच सहभागी असल्यामुळे वरिष्ठ कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते. गावचा प्रथम नागरिक पोलीस पाटीलच सामान्य जनतेला त्रासदायक ठरत असेल, तर न्याय मागावा तरी कोणाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, कायद्याचे पालन न करणार्‍या पोलीस पाटलास निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष घालून उपोषणकर्त्यांंच्या मागणीची दखल घेणे आवश्यक आहे.