शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

धान्याच्या गोदामांवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

अन्न व पुरवठा विभागाचा उपक्रम.

नागेश घोपेवाशिम: भ्रष्टाचाराच्या वाळवीने नखशिखांत पोखरलेल्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजाराला लगाम लावण्यासाठी, स्वत धान्य दुकानांना धान्य वितरण करणार्‍या सर्व शासकीय गोदामांमध्ये आता क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. प्रारंभी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येत असून, नंतर तिचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.राज्यातील गरजू लाभार्थ्यांंना अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र सदर वितरण प्रणालीला भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरले आहे. परिणामी, जनतेचा या प्रणालीवरील विश्‍वास उडाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी, अन्न व पुरवठा विभागाने विविध उपाययोजना राबविण्याचा चंग बांधला आहे. पुरवठा विभागाची तालुक्याच्या ठिकाणी गोदामे आहेत. तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना त्या गोदामांमधून, धान्याचा पुरवठा करण्यात येतो. बहुतांश वेळा संबधित वितरकाने उचललेले धान्य लाभार्थ्यांपर्यंत न जाता, थेट काळाबाजारात पोहोचते. परिणामी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही. वितरण प्रणालीतील या काळाबाजाराला पायबंद घालण्यासाठी वितरणापासूनच स्वस्त धान्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी गोदामांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे. यामुळे सरकारी गोदामांमधील सर्व हालचाली कॅमेर्‍यात कैद होऊन, त्या तहसील कार्यालयातील संगणकासह अधिकार्‍यांच्या मोबाईलमध्ये दिसणार आहेत. सदर उपक्रमामुळे धान्याच्या उचलीची इत्यंभूत माहिती बसल्या जागी मिळणार आहे.