मंगरुळपीर येथे बुद्ध जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST2021-06-28T04:27:24+5:302021-06-28T04:27:24+5:30

मंगरुळपीर येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ७ वाजता महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे व विश्वरत्न ...

Buddha Jayanti celebrations at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे बुद्ध जयंती उत्साहात

मंगरुळपीर येथे बुद्ध जयंती उत्साहात

मंगरुळपीर येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ७ वाजता महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पौर्णिमा व सानिका इंगळे यांनी केली. त्यानंतर, सामूहिक वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रा.संजय इंगळे आणि संच मंगरुळपीर यांनी संगीतमय प्रबोधनपर बुद्ध भीम गीते सादर करून बुद्ध पहाट साजरी केली. बुद्ध पहाट कार्यक्रमाचे निवेदन विनोद डेरे यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातले नावाजलेले गायक कलावंत पौर्णिमा इंगळे, सानिका इंगळे, प्रा.संजय इंगळे, राहुल कांबळे, अजय कटके, सम्यक संजय भगत, रमेश कांबळे, तबलावादक सचिन धुर्वे, हार्मोनियम किसनराव कांबळे, यांनी आपली प्रबोधनपर संगीतमय प्रस्तुती सादर केली. कार्यक्रमाचे आयोजन विनोद डेरे यांनी केले होते.

Web Title: Buddha Jayanti celebrations at Mangrulpeer